सॅनिटरी नॅपकिनला टॅक्स फ्री करण्यासाठी ग्वालियरमधील महिलांनी एक अभियान सुरू केलं आहे. केंद्र सरकारने सॅनिटरी नॅपकिन्सवर जीएसटी लावण्याबाबत घोषणा केल्यानंतर त्याला विरोध करण्यासाठी काही महिलांनी पुढाकार घेऊन अभियान राबवलं आहे. या अभियानाअंतर्गत १ हजार सॅनिटरी नॅपकिन्सवर संदेश लिहून हे नॅपकिन्स पंतप्रधान मोदींना पाठवण्यात येणार आहेत.सॅनिटरी नॅपकिन्सची किंमत ही सर्वसामान्य महिलांना न परवडणारी आहेत. सॅनिटरी नॅपकिन्सचे दर अधिक असल्यानं अनेक गरीब महिला त्या विकत घेऊ शकत नाही. त्यातून जीएसटी लावल्यानंतर हे दर आणखी वाढतील त्यामुळे काही महिला त्या खरेदी करू शकत नाहीत असं अनेकांचं म्हणणं आहे. सॅनिटरी नॅपकिन्स परवडणारे नसल्यानं अनेक महिलांना आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. ४ जानेवारीपासून हे अभियान सुरू करण्यात आलं असून सॅनिटरी नॅपकिन्सची किंमत घटवावी या मागणीसाठी महिलांनी नॅपकिन्सवर संदेश लिहिले आहेत.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews